साकेगावात क्रीडाप्रेमींकडून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
भुसावळ (2 फेब्रुवारी 2026) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली आहे. क्रीडा विषयी तातडीने निर्णय घेणारे व क्रीडा संघटन मजबूत करणारे अजित पवार यांना साकेगाव येथील क्रीडाप्रेमी यांनी मॉर्निंग सीसी व एसपीएल ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते. अजित पवार यांच्या क्रीडा विषयी धोरणाच्या आठवणींना उजाळा मिळाला तसेच अजितदादा अमर रहे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.


