अट्रावलच्या मुंजोबा यात्रेत पाच महिलांच्या सोन्याच्या पोत लांबवल्या
In the Munjoba fair of Atraval, gold necklaces of five women were stolen यावल (2 फेब्रुवारी 2026) : यावल तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाची यात्रा गेल्या महिन्यात सुरू झाली होती तर शनिवारी शेवटच्या वाराला यात्रेत गर्दीचा फायदा घेत पाच महिलांच्या गळ्यातून सोन्याच्या पोत अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गर्दीचा फायदा घेत सदर महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती चोरी करण्यात आल्या.
गर्दीची फायदा घेत चोरी
अट्रावल, ता.यावल येथील प्रसिद्ध मुंजोबाची यात्रा गेल्या महिन्यात सुरू झाली. दरम्यान येथे शनिवारी शेवटच्या वाराला मुंजोबा मंदिरावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राखी सुरवाडे, रूपाली कोळी, मंदाकिनी मुकेश गजरे, रोहिणी जाधव, स्वाती वराडे अशा या पाच महिलांच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत चोरी केल्या.
याप्रकरणी मंदाकिनी गजरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


