!-- afp header code starts here -->

बारदान विक्रीच्या बहाण्याने जळगावात व्यापार्‍याला सहा लाखात गंडवले


In Jalgaon, a businessman was swindled out of six lakh rupees under the pretext of selling gunny sacks जळगाव (4 फेब्रुवारी 2026) : जळगावच्या डीएसपी चौकात बारदान विक्रीच्या बहाण्याने व्यापार्‍याची सहा लाखात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले शहरात ?
जळगाव शहरातील प्रजापत नगर भागातील रहिवासी आणि व्यावसायीक प्रकाश श्रीराम प्रजापत (50) यांना संशयित आरोपी रविंद्र तायडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी बारदान विक्रीचा व्यवहार करण्याचे आमिष दाखवले. हा व्यवहार 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 ते 5.30 वाजेच्या दरम्यान डीएसपी चौकातील सार्वजनिक ठिकाणी झाला. आरोपींनी फिर्यादी प्रजापत यांच्याकडून एकूण सहा लाख रुपये घेतले.

बारदान न देता फसवणूक
रक्कम घेऊनही बारदान न देता संशयितांनी प्रजापत यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकाश प्रजापत यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर रविंद्र तायडे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !