!-- afp header code starts here -->

दुचाकी चोरी : भुसावळसह जळगावातील आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Two-wheeler theft : Accused from Bhusawal and Jalgaon caught in the net of MIDC police जळगाव (4 फेब्रुवारी 2026)  : जळगाव शहरातून दुचाकी लांबवल्याप्रकरणी जळगावसह साकेगाव, ता.भुसावळ येथील आरोपीला अटक करण्यात आली.

काही क्षणात लांबवली दुचाकी
धानोरा खुर्द येथील रहिवासी शालिक पाटील हे काही दिवसांपूर्वी कामानिमित्त जळगाव शहरातील काशीनाथ चौक भागात आल्यानंतर त्यांनी आपली हिरोहोंडा सुपर स्पेंडर (एम.एच.19 ए.के.207) ही पार्क केली व ते सामान घेण्यासाठी गेले मात्र परत आल्यावर त्यांना आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरुन दोघांना अटक
एमआयडीसी पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मदतीने पोलिसांनी आतीश जितेंद्र पोथीवाल (रा.कांचन नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला साथीदार गणेश लक्ष्मण कोळी (रा.साकेगाव, भुसावळ) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरीला गेलेली दुचाकी (एम.एच.19 ए.के.0207) हस्तगत केली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, शोध पथकाने राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी, गणेश ठाकरे, राहुल घेटे, योगेश घुगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. तपास पोलिस नाईक प्रदीप चौधरी आणि योगेश घुगे करीत आहेत.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !