!-- afp header code starts here -->

साकरी घटनेतील संशयीतांनी वापरलेली दुचाकी जप्त

पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे पुराव्यांची जुळवाजुळव सुरू


भुसावळ (4 फेब्रुवारी 2026) : भुसावळ तालुक्यातील साकरी शिवारात दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून हत्या करण्यात आली होती. या घटनेत संशयितांनी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून ग्रामपंचायतीमधून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

विहिरीत ढकलून केली हत्या
काही दिवसांपूर्वी साकरी येथील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींची विहिरीत ढकलून देत हत्या करण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाला वेग देत संशयितांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या गुन्ह्यात तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत गोपनीयपणे माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे.

फुटेजसह दुचाकी जप्त
पोलिसांना एक दुचाकी आढळली असून ती गुन्ह्यात वापरल्याचा संशय आहे तसेच महामार्गावरील आणि साकरी गावातील प्रवेशद्वारांवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहे. भुसावळचे डीवायएसपी केदार बारबोले या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !