जळगावात लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
In Jalgaon, a minor girl was sexually assaulted under the pretext of marriage जळगाव (4 फेब्रुवारी 2026) : जळगावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. संशयित आरोपी राहुल रमेश राठोड (25, रा.पिप्राळा) याने 29 जानेवारी रोजी पीडितेला फुस लावून सुरतला नेत पीडीतेवर इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरतला नेत केला अत्याचार
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपीने तिला सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले व तिथे 30 रोजी रात्री 11 वाजता वरच्या मजल्यावर तिच्यावर अत्याचार केला. तेथे आरोपीने तिला धमकी दिली की, जर तिने या घटनेबाबत कोणालाही सांगितले तर तो तिला जिवंत सोडणार नाही. घाबरलेल्या पीडितेने जळगावला परतल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय भूषण कोते करीत आहेत.








