मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार
A married woman was assaulted after being threatened with the murder of her daughter पाचोरा (4 फेब्रुवारी 2026) : 23 विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना पाचोरा तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी बाळू काळू राठोड या संशयीताविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीला मारण्याची धमकी
आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला हिसकावून घेत ‘मी मुलीचे बरेवाईट करेन’ अशी धमकी देत पीडीतेला पाचोरा येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही आरोपीने महिलेला बदनामी करण्याची धमकी देऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील एका हॉटेलवर नेऊन पुन्हा अत्याचार केला.

पीडितेने या त्रासाला कंटाळून अखेर पाचोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.







