!-- afp header code starts here -->

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार : कंपनीच्या उत्पन्नात 17.4 टक्क्यांची वाढ


Jain Irrigation’s quarterly results are strong: the company’s revenue increased by 17.4 percent जळगाव (5 फेब्रुवारी 2026) : कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आर्थिक वर्ष 2026 तिसर्‍या तिमाहीचे आणि नऊ महिन्यांचे एकत्रीत आर्थिक निकाल जाहीर केले. त्यात कंपनीच्या उत्पन्नात (महसूलात) 17.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचे एकत्रित उत्पन्न एक हजार 598 कोटींवर पोहोचले आहे. ईबीआयटीडी (व्याज, कर, घसारा व अमॉर्टायझेशनपूर्व नफा) 168 कोटींचा दिसतो आहे. या निकालामुळे बाजारात कंपनीच्या वाढीच्या क्षमतेबाबत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.

तिसर्‍या तिमाहीत कंपनीची चांगली कामगिरी : अनिल जैन
चालू आर्थिक वर्षाच्या या तिमाही कंपनीची चांगली कामगिरी झाली आहे त्यामुळे ती अत्यंत मजबूत ठरली आहे. सर्व व्यवसाय विभागांमध्ये दुहेरी अंकातील वाढ नोंदविण्यात आली आहे. अलीकडील जीएसटी दरांतील कपातीमुळे मागणीला चालना मिळाली असून महसूल वाढीस त्याची मदत झालेली आहे. कार्यक्षम अंमलबजावणी व रोख शिस्तीमुळे कार्यभांडवल चक्रात लक्षणीय सुधारणा झाली असून ऑपरेशन्समधून मजबूत रोख प्रवाह निर्माण झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या नऊ महिन्यांत महसुलात सातत्यपूर्ण वाढ झाली असून मार्जिनमध्येही सुधारणा दिसून येत आहे. किरकोळ व्यवसायावर वाढलेला भर, कार्यक्षमता सुधारणा आणि खर्च नियंत्रण याचे हे सकारात्मक परिणाम आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा खर्चामुळे पाइपिंग व्यवसायाला गती मिळेल, तर सौर कृषी पंप व ग्रामीण विकासावर केंद्रित धोरणामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या कृषी-प्रक्रिया विभागाने नामांकित आणि अग्रगण्य शीत पेय कंपनी बरोबर नवीन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले असून ट4ऋध26 पासून नवीन प्रकल्पातून उत्पन्न योगदान अपेक्षित आहे. तसेच टोमॅटो प्युरी उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही कंपनी शाश्वत वाढ व भागधारकांना मूल्यनिर्मिती करण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !