गुंतवणूकदारांची झोप उडाली : बिटकॉईनच्या किंमतीत ऐतिहासीक घसरण
Investors are losing sleep: Bitcoin price sees a historic fall मुंबई (6 फेब्रुवारी 2026) : जगातील सर्वात मोठे डिजिटल चलन बिटकॉइन पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळू लागल्याने गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. गुरुवारी बिटकॉइनच्या किमतीत ऐतिहासिक 12.6% घसरण होवून ती 63,300 पर्यंत घसरल्याने गुंतवणूकदारांची संपत्ती बेचिराख झाली.
2024 नंतर प्रथमच मोठी पडझड
ऑक्टोबर 2024 नंतर बिटकॉइनमध्ये इतकी मोठी पडझड झाली आहे. केवळ बिटकॉइनच नव्हे तर क्रिप्टो बाजारातील दुसरे मोठे चलन, इथरमध्ये देखील 13 टक्क्यांपेक्षा जास्त विक्री नोंदवली गेली. ऑक्टोबर 2025 मध्ये उच्चांकी झेप घेतल्यापासून क्रिप्टो बाजारातून 2 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम बाहेर पडली आहे.

क्रिप्टो बाजार घसरण्याचे कारण काय
केवळ बिटकॉइनवरच नाही तर या मोठ्या प्रमाणात विक्रीचा परिणाम इतर क्रिप्टोकरन्सीवरही होताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांना फेड रिझर्व्ह बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून नामांकित केल्यापासून क्रिप्टो बाजारातील पडझड आणखी तीव्र झाली. त्यानंतर गुंतवणूकदारांनी धोकादायक मालमत्ता विकण्यास सुरुवात केली. ज्याचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. या मोठ्या विक्रीमुळे बिटकॉइनची किंमत 65,000 च्या खाली गेली तर, क्रिप्टो मार्केट कॅप देखील 2.64 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत घसरला.
बाजार तज्ज्ञ म्हणतात की जोखीम टाळणे, मोठ्या प्रमाणात लिक्विडेशन, टेक स्टॉकमधील कमकुवतपणा आणि कडक अमेरिकन चलनविषयक धोरणाची भीती यामुळे क्रिप्टो गुंतवणूकदार हादरले आहेत. कॉईन ग्लासच्या आकडेवारीनुसार, किंमत घसरल्याने लीव्हरेजसह व्यापार करणार्या गुंतवणूकदारांना बाहेर काढण्यात आले म्हणून केवळ 24 तासांत जवळजवळ एक अब्ज किमतीच्या बिटकॉइन पोझिशन्स जबरदस्तीने बंद करण्यात आल्या. लिक्विडेशन पातळी ओलांडली, विक्री तीव्र झाली, ज्यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये डोमिनो इफेक्ट निर्माण झाला.







