ड्रायव्हिंग शिकताना जुळले सूत ; नंतर लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार
Their relationship began while learning to drive ; later, the man sexually assaulted the married woman under the pretext of marriage मुंबई (6 फेब्रुवारी 2026) : राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटनात सातत्याने वाढताना दिसून येत आहे. ड्रायव्हिंग क्लासचे प्रशिक्षण घेताना प्रशिक्षकासोबत आकर्षण निर्माण झाल्यानंतर संशयीताने लग्न करण्याचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार केला. नवी मुंबईतील तळोजा भागात घडलेल्या घटनेनंतर आरोपीच्या विरोधात बलात्कारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.किरण पावशे (तळोजा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी किरण पावशे याचे तळोजा भागात मोटर ट्रेनिंग स्कूल आहे. जुलै 2022 मध्ये पीडिता तिथे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवले.

तिच्या पतीने तिला सोडून दिल्यास, तिचा सांभाळ करण्याचे आश्वासन देऊन मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तीन वर्ष हा प्रकार चालला. पीडितेने आरोपीला विरोध केला असता आरोपीने तिच्या मुलाला मारण्याची धमकी दिली तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
यानंतर पीडितेने 4 फेब्रुवारी रोजी तळोजा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







