!-- afp header code starts here -->

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले ; अजितदादांच्या मृत्यूनंतर होणारे खालचे राजकारण बंद व्हावे !


Chief Minister Devendra Fadnavis clearly stated: The petty politics that will follow Ajit Dada’s death must stop मुंबई (6 फेब्रुवारी 2026) : अजित दादा पवार हे दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले आहेत. त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. अशा प्रकारचे खालचे राजकारण बंद झाले पाहिजे, असे ठाम मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

वादावर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी
अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय वादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्दैवी घटनेतून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनतेत लोकप्रिय असलेले नेते अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करणे अत्यंत चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. या घटनेतून राजकारण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. हे खालच्या पातळीचे राजकारण तात्काळ थांबले पाहिजे, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

विमान अपघातात झाले अजितदादांचे निधन
मुंबईहून बारामतीकडे प्रचारसभेसाठी रवाना झाले असताना अजित पवार यांच्या विमानाचा धावपट्टीजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये विमान कोसळल्यानंतर मोठे स्फोट झाल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर विविध तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. तपासासाठी केंद्रीय पथक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून, अपघाताचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीवरूनही चर्चा रंगल्या. मात्र, फडणवीसांनी स्पष्ट केले की, या सर्व घडामोडींमध्ये अनावश्यक राजकीय अर्थ लावणे योग्य नाही. दु:खद प्रसंगात संयम राखणे आणि कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !