जळगावातून महागडी चारचाकी चोरट्यांनी लांबवली
A luxury car was stolen by thieves in Jalgaon जळगाव (8 फेब्रुवारी 2026) : शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरातील आय.एम.आर. कॉलेजजवळून चोरट्यांनी आठ लाख रुपये किंमतीची टाटा नेक्सॉन कार लांबवली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग सुरू आहे.
वाहन धारक धास्तावले
फिर्यादी प्रदीप जगतसिंग पाटील (61, रा.रामबाग कॉलनी, प्रोफेसर कॉलनी जवळ, जळगाव) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी आपली पांढर्या रंगाची टाटा नेक्सॉन (एम.एच.19 डी.व्ही.7790) ही मंगळवार, 3 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरासमोर पार्क केली होती.
दुसर्या दिवशी 4 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांना आपली कार जागेवर दिसून न आल्याने त्यांनी शोध घेतला मात्र कार चोरीला गेल्याचे लक्षात आले.
अखेर 7 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मिलिंद सोनवणे करत आहेत.


