चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवले : आरोपीला शिरपूर तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
The wife was killed due to suspicion of infidelity: The accused has been arrested by Shirpur Taluka police शिरपूर (9 फेब्रुवारी 2026) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच तिची निर्घृण हत्या केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील प्रधानदेवी येथे घडली होती. खुनानंतर संशयीत पसार झाला होता मात्र तो घरी येणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पमा झंझाड्या पावरा (रा. प्रधानदेवी, पोस्ट उर्मदा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
संशयातून पत्नीला संपवले
30 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास आरोपी पमा झंझाड्या पावरा (रा. प्रधानदेवी) याने आपल्या पत्नीला घराजवळील नाल्यात नेऊन लाकडी दांडक्याने डोक्यावर तसेच हात-पायांवर बेदम मारहाण करून फेकून दिले होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ही घटना घडली होती तर आरोपी खुनानंतर पसार झाला होता. खून प्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ आसाराम भायला सेनानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल होता.
दहा दिवसानंतर आरोपी जाळ्यात
आरोपी खुनानंतर पसार झाला होता मात्र आरोपी घरी कपडे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्यास 8 रोजी रात्री 11.30 वाजता अटक केली.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील बसावे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील संतोष पाटील, संदीप ठाकरे, भुषण पाटील, योगेश मोरे, संजय भोई, सुनील पवार, स्वप्निल बांगर, विजय ढिवरे, गुरदास बडगुजर, मनोज नेरकर, कृष्णा पावरा, चालक अल्ताफ मिर्झा व गिरधर पाटील आदींच्या पथकाने केली.
