जामनेर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्र लांबवले


Taking advantage of the crowd at the Jamner bus station, a mangalsutra was stolen जामनेर (9 फेब्रुवारी 2026) : वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवण्यात आल्याची घटना जामनेर बसस्थानकावर घडली. . याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गर्दीत साधली संधी
फिर्यादी मंगलाबाई हिरालाल जैन (69, सध्या रा.लोहगाव, पुणे, मूळ रा. भुसावळ) या रविवार, 8 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.20 वाजेच्या सुमारास जामनेर बसस्थानकावर आल्या असता त्या पाचोरा ते भुसावळ या मार्गावरील बसने (क्रमांक 2306) भुसावळकडे जायचे होते. यावेळी बसमध्ये चढत असताना या गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने मंगलाबाई यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम 1 मिली वजनाची व 70 हजार रुपये किंमतीची पोत (मंगळसूत्र) लांबवले.

चोरी झाल्याचे लक्षात येताच मंगलाबाई यांनी जामनेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रविवार, 8 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळू भोई तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !