सोशल मिडीयावर महामानवाबद्दल अवमानजनक वक्तव्य करणार्‍या भुसावळातील मनोविकृत भूषण पाटील विरोधात गुन्हा


A case has been registered against Bhushan Patil, a mentally disturbed individual from Bhusawal, for making derogatory remarks about a great historical figure on social media भुसावळ (9 फेब्रुवारी 2026) : फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात अवमानजनक वक्तव्य करणार्‍या भुसावळातील मूळ रहिवासी व डोंबिवलीस्थित भूषण भास्कर पाटील विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील विकृत भूषण पाटील विरोधात भुसावळ शहर, बाजारपेठ व वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर आरोपीच्या कृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आलेले नाही.

नेमका प्रकार काय?
शुक्रवार, 6 फेब्रुवारीच्या रात्री 11:30 ते 7 फेब्रुवारीच्या पहाटे दरम्यान, आरोपी भूषण भास्कर पाटील (रा.डोंबिवली, जि. ठाणे) याने फेसबुक लाईव्हवर एक व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत विखारी आणि विटंबना करणारी भाषा वापरली

मंत्री संजय सावकारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह परिवाराविषयी आरोपीने अर्वाच्च भाषेत उल्लेख केल्याने संताप व्यक्त होत आहे. त्या शिवाय भुसावळातील वकील जगदीश कापडे, किरण कोलते आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांविषयी आरोपीने आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग केला.

आरोपीविरोधात गुन्हा
भुसावळचे रहिवासी विनोद अशोक सोनवणे (वय 48, रा. पंचशील नगर) यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपी भूषण पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 196, 299, 352, 353, 351, 197 सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा बाजारपेठ पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !