आठ लाखांची लाच भोवली : नंदुरबार सा.बां.विभागाचा उपअभियंता धुळे एसीबीच्या जाळ्यात
धुळ्यातील सा.बां.विभागाच्या कार्यालयात स्वीकारली लाच : लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ
गणेश वाघ
Bribes worth eight lakhs proved costly : The deputy engineer of the Nandurbar Public Works Department caught in the net of Dhule ACB धुळे (9 फेब्रुवारी 2026) : विद्युत ठेकेदाराला अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात साडेआठ लाखांची लाच मागून तडजोडीअंती आठ लाख रुपये स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत उपविभागाचे उपअभियंता नितीन इंगळे यांना धुळे एसीबीने सोमवार, 9 रोजी सायंकाळी धुळ्यातील सा.बां.विभागाच्या कार्यालयात अटक केल्याने लाचखोर प्रचंड हादरले आहेत. महिन्याकाठी लाखो रुपये वेतन घेणार्या वर्ग एकच्या अधिकार्यावर झालेल्या कारवाईची धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.
असे आहे लाच प्रकरण
लाच प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून दोंडाईचातील रहिवासी आहेत. त्यांना सा.बां.विभाग धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये व पाड्यांवर एलईडी सोलर स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी जीएसटी वगळता दोन कोटी 37 लाख 29 हजार 356 रुपयांची निविदा मंजूर झाली होती व कामाची वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर मार्च 2025 मध्ये 41 लाखांचे बिल निघाले होते. हे बिल निघाल्याच्या मोबदल्यात तसेच उपअभियंता इंगळे यांनी 80 हजारांची लाच स्वीकारुन उर्वरीत 30 हजार रुपये पुढील बिलात द्यावे लागतील, असे सांगितले होते तर तक्रारदाराला डिसेंबर 2025 मध्ये दोन कोटी दोन लाख पाच हजार 525 रुपये बँक खात्यात बिलापोटी आल्यानंतर इंगळे यांनी बिल जमा केल्याच्या मोबदल्यात साडेआठ लाखांची लाच मागितली होती. धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला. संशयीत धुळ्यातील सा.बां.कार्यालयात आल्यानंतर आल्यानंतर त्यांनी आठ लाखांची लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृवात पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेशमा परदेशी, सुधीर मोरे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
