!-- afp header code starts here -->

वाळूचा डंपर सोडण्याच्या मोबदल्यात 30 हजारांची लाच : ममुराबाद तलाठ्यासह मंडळाधिकारी जाळ्यात


गणेश वाघ
भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : वाळूचे डंपर सोडण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती 30 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना ममुराबाद तलाठी सदानंद व्यंकट मुंडे (34) व म्हसावद मंडळाधिकारी अभिजीत नामदेव येवले (39) यांना जळगाव एसीबीने बुधवारी जुने जळगावातील मंडळाधिकार्‍यांच्या कार्यालयातच सायंकाळी अटक केली. या कारवाईने महसूल प्रशासनाने लाचखोर हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार वाळू व्यावसायीक आहेत. 4 रोजी रात्री 10.30 वाजता तलाठी मुंडे यांनी वाळूचा डंपर पकडला होता व मंडळाधिकारी येवले यांचा फोन आल्यानंतर हा डंपर सोडण्यात आला मात्र डंपर सोडण्याच्या मोबदल्यात आरोपीने 50 हजारांची लाच मागितली व या संदर्भात तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार दिली. पडताळणीत आरोपींनी 30 हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवार, 11 रोजी सायंकाळी मुंडे यांनी लाच रक्कम स्वीकारल्यानंतर मंडळाधिकारी येवले यांनाही अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ही कारवाई मंडळाधिकारी येवले यांच्या जुने जळगावातील कार्यालयात करण्यात आली.


लाचखोरांकडे रकमेचे सापडले घबाड
आरोपी तलाठी मुंडे याच्याकडे 40 हजार 200 रुपयांची रोकड तसेच मोबाईल व मंडळाधिकारी येवले यांच्याकडे सात हजार 600 रुपये रोख व मोबाईल सापडल्याने तो जप्त करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, चालक बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रदीप पोळ, चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !