अवैध गौण खनिज वाहतूक : भुसावळ तहसील प्रशासनाकडून दोन लाख 40 हजारांचा दंड वसुल
Illegal minor mineral transportation: Bhusawal Tehsil administration recovers fine of Rs. 2.40 lakh भुसावळ (11 फेब्रुवारी 2026) : भुसावळ तालुक्यात किन्ही परिसरात अवैध गौण खनिज (डबर/मुरूम) वाहतूक सुरू असताना भुसावळ महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत डंपर जप्त केला व संबंधितास दोन लाख 39 हजार 230 रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली.
कारवाईने उडाली खळबळ
महसूल पथकाला आशा कन्स्ट्रक्शन कंपनीचा डंपर (एम.एच.19 सी.वाय.0438) हा गौण खनिज (डबर) वाहतूक करताना आढळला. वाहना धारकाकडे गौण खनिज वाहतूक परवाना नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली. संबंधित डंपर जप्त करून तो भुसावळ तहसील कार्यालयात ठेवण्यात आला.







