!-- afp header code starts here -->

तडीपार संशयीताची जळगावात कोयत्याच्या धाकावर दहशत


Suspected smuggler terrorizes Jalgaon over fear of Koyata जळगाव (12 फेब्रुवारी 2026) : तडीपार असतानाही कोयता बाळगून शहरात आलेल्या संशयीताला जळगाव शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगावात?
मंगळवार, 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील गेंदालाल मिल भागातील साईबाबा मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. बापू सायकल मार्टच्या बाजूला असलेल्या कानळदा रोडवर एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस कर्मचारी अमोल अशोक ठाकूर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तनवीर उर्फ तन्या रहीम शेख (30, रा. गेंदालाल मिल) असे आहे. विशेष म्हणजे, आरोपी तनवीर याला उपविभागीय दंडाधिकारी जळगाव विभाग यांनी 7 फेब्रुवारी 2026 पासून पुढील तीन महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले होते मात्र प्रशासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत आरोपी शहरात विनापरवाना प्रवेश करून दहशत माजवत होता

पोलिसांनी आरोपीकडून 40 सेमी लांबीचा आणि लाकडी मूठ असलेला लोखंडी कोयता जप्त केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !