!-- afp header code starts here -->

महिलांना बोलण्यात गुंतवत दागिने लांबवणार्‍या भामट्या महिलेला अटक


अमळनेर (14 फेब्रुवारी 2026) :  वृद्ध महिलांना बोलण्यात गुंतवून व बतावणी करून त्यांचे दागिने लंपास करणार्‍या चोपडा तालुक्यातील वटार येथील महिलेस अमळनेर पोलिसांनी अटक केली. आशाबाई बाळू तायडे (63) असे अटकेतील संशयीत महिलेचे नाव आहे.

काय आहे नेमका प्रकार ?
31 जानेवारी रोजी सिंधुबाई संतोष चव्हाण (76, रा अजंदे, ता.शिंदखेडा) ही महिला जळगाव जाण्यासाठी अमळनेरला दुपारी 12 वाजता पोहोचली असता यावेळी एक अनोळखी महिलाने जबरदस्तीने फुटाणे खायला दिले. यावेळी महिला सिंधुबाई यांना बसस्थानकाबाहेर रस्ता ओलांडून मेडिकलवर घेऊन गेली. तेथे गेल्यावर तिच्या पाठीवर हात ठेवून तुझी माळ छान आहे, मला फोटो काढायला दे म्हणून तिने माळ मागितली आणि सिंधुबाईने माळ काढून दिली.


मात्र फोटो काढण्यासाठी गेलेली महिला माळ घेऊन गेली तरी परत आलीच नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शोध पथकाला आरोपी शोधण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशीव, निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण करून, सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपी महिलेचा शोध घेतला असता ती वटार, ता.चोपडा येथील आशाबाई बाळू तायडे निघाल्याने तिला 13 रोजी अटक करण्यात आली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !