!-- afp header code starts here -->

शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई : 41 लाखांचा गांजा जप्त


Major action by Shirpur Taluka Police : Marijuana worth Rs 41 lakh seized शिरपूर (15 फेब्रुवारी 2026) : शिरपूर तालुका पोलिसांनी गांजा शेतीवर कारवाई करीत 41 लाखांचा 820 किलो गांजा जप्त केल्याने गांजा शेती फुलवणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राशा समदा पावरा (50) विरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे तब्बल दोन किलोमीटर पायी प्रवास करीत पोलिसांनी ही कारवाई केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा गावाच्या शिवारात गांजा शेती फुलवण्यात आल्याची माहिती शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह छापेमारी केली. यावेळी 820 किलो वजनाचा व सुमारे 41 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला व संशयीत राशा समदा पावरा यास ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई शनिवार, 14 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक, अजय देवरे, उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, संतोष पाटील, जाकीरोद्दीन शेख, जगन्नाथ सोगनाथ कोळी, राजू ढिसले, विजय ढिवरे, स्वप्नील वसंत बांगर, दिनकर नारायण पवार, वाला पुरोहित, कृष्णा पावरा, चालक अल्ताफ बेग, उस्मान बेग मिर्झा तसेच कॉन्स्टेबल इसरार फारुकी आदींच्या पथकाने केली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !