!-- afp header code starts here -->

दीड वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार


Manslaughter of one and a half year old child मुंबई (16 फेब्रुवारी 2026) : अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीवर अज्ञात नराधमाने अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या दहिसर परिसरात घडली. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने मुंबई सेंट्रल येथील बीएमसी संचालित नायर रुग्णालयात हलवण्यात आले. तिच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या ती अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे.

अज्ञाताने अपहरण करीत केला अत्याचार
दहिसर रेल्वे स्थानकाजवळ फुटपाथवर राहून फुले विकणार्‍या कुटुंबातील ही दीड वर्षांची मुलगी 10 फेब्रुवारीच्या पहाटे अज्ञात व्यक्तीने पळवून नेले व तिच्यावर अत्याचार करून नराधमाने तिला स्थानिक मासळी बाजाराजवळील एका कचर्‍याच्या गटारात फेकून दिले. सकाळी मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात येताच कुटुंबाने दहिसर येथील एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी तत्परतेने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !