चाळीसगाव खुनाने हादरले : रिक्षासाठी पैसे न देणार्या पित्याचा मुलाकडून खून
Chalisgaon shaken by murder: Father murdered by son for not paying for rickshaw चाळीसगाव (16 फेब्रुवारी 2026) : चाळीसगावात मुलाच्या मारहाणीत पित्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला रीक्षा घेण्यासाठी पित्याने पैसे देण्यास नकार दिल्याने 68 वर्षीय पित्याला मुलाने काठीने बेदम मारहाण केल्याने त्यातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. भिकन रणा मोरे (68, एम.जे.नगर, ठाकूरसिंहजी महाराज नगराजवळ, चाळीसगाव) असे मृताचे तर कल्पेश भिकन मोरे असे संशयीत मुलाचे नाव आहे.
काय घडले चाळीसगावात ?
भिकन मोरे हे चाळीसगाव शहरातील एम.जी.नगरात पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मुलगा कल्पेश हा त्यांच्याकडे रिक्षा घेण्यासाठी पैशाची मागणी करत होता. शनिवारी सायंकाळीही तो यावरून आई सखुबाई मोरे व वडील भिकन मोरे यांच्याशी वाद घालत होता. पैसे देण्यास वडीलांनी नकार दिल्याने कल्पेश मोरे याने काठीने व कमरेच्या पट्टयाने वृद्ध वडिलांना मारहाण केली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी आरोपीने मयत वडीलांना शिवीगाळ करून रागाच्या भरात लाकडी काठीने त्यांच्या चेहर्यावर
व पायावर डोक्यावर बेदम मारहाण केली. यात भिकन मोरे हे गंभीर जखमी झाल्याने ते बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचाराकामी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासुन मतय घोषित केले.

अधिकार्यांची धाव
घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी भेट दिली. तपासाची चक्रे फिरवत आरोपी कल्पेश भोरे याला बेड्या ठोकण्यात आल्या. मयत भिकन मोरे यांच्या पत्नी सखूबाई मोरे यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास एपीआय भरत चौधरी करीत आहेत.







