!-- afp header code starts here -->

दीपनगर वसाहतीत चोरट्यांच्या हल्ल्यात चार सिक्युरिटी गार्ड गंभीर जखमी


Four security guards seriously injured in attack by thieves in Deepnagar colony भुसावळ (16 फेब्रुवारी 2026)  : रात्रीच्या अंधारात चोर शिरल्याने त्यांना रोखण्यासाठी धावलेल्या चार सुरक्षा कर्मचार्‍यांवर अंधारात चोरट्यांनी हल्ला करीत त्यांची डोकी फोडली. ही धक्कादायक घटना दीपनगर वसाहतीत 14 रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास घडली. य प्रकरणी चौकडीविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
भुसावळजवळील दीपनगर वसाहतीमधील डी 18 ईमारतीजवळ शनिवारी पहाटे तीन वाजता चोर शिरल्याची माहिती ड्युटीवर तैनात सुरक्षा रक्षकांना कळताच त्यांनी पाठलाग केला मात्र अंधारात दडून बसलेल्या चार चोरट्यांनी यावेळी चार सुरक्षा रक्षकांवर अंधारातच हल्ला केला व धारदार शस्त्राने सुरक्षा रक्षकांच्या डोक्यावर काही तरी शस्त्र मारून दुखापत करीत पळ काढला. या प्रकारानंतर या भागात खळबळ उडाली तर जखमी अवस्थेत सुरक्षा रक्षकांना उपचारार्थ हलवण्यात आले. चोरट्यांच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षक प्रकाश बडगुजर, गजानन बावस्कर, राकेश कुलकर्णी, जितेंद्र तायडे हे जखमी झाले. हल्ल्या प्रकरणी दीपनगर केंद्राचे उपव्यवस्थापक प्रदीप मनोहर जांभुळकर (45) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञत चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संदीप बडगे करीत आहेत.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !