भुसावळसह सुरतमधून दुचाकी लांबवणार्या मुक्ताईनगरच्या चोरट्याला संयुक्त कारवाईत बेड्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिसांची कारवाई : दोन दुचाकी जप्त
दोन दुचाकी जप्त
भुसावळ शहरातील कोर्ट आवारातून 3 फेब्रुवारी 2026 रोजी अॅड.रोकडे यांची हिरोहोंडा कंपनीची एचएफ डिलक्स (क्रमांक एम.एच.39 टी.6102) चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होता व ही दुचाकी किरण पाटील या संशयीताने चोरल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेसह भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत आरोपीला अटक केली. आरोपीकडून भुसावळातून चोरलेल्या दुचाकीसह गुजरातच्या सुरत येथून लांबवलेली हिरोहोंडा शाईन (जी.जे.05 एन.ए.6180) दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, अटकेतील आरोपी अट्टल असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध मलकापूर पोलीस स्टेशन व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनलाही गुन्हे दाखल आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच भुसावळचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, एपीआय राहुल भंडारे, कॉन्स्टेबल राहुल भोई, नाईक नितीन चौधरी आदींच्या पथकाने केली.







