प्राचार्यांनी मारल्यामुळे जळगावात फार्मसीच्या विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल
Pharmacy student in Jalgaon faces extreme measures after being beaten by principal जळगाव (17 फेब्रुवारी 2026) : जळगावच्या गुलाबराव देवकर बी.फार्मसी कॉलेजच्या दुसर्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या मारहाणीमुळे व्यथित होवून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थ्याने घडला प्रकार चिठ्ठीत नमूद करीत या कृत्याला प्राचार्य जवाबदार असल्याचे म्हटले. श्याम प्रभाकर पाटील (19, रा.बोदवड) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येनंतर प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते गायब झाले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण ?
प्रभाकर पाटील (रा.मोताळा, बुलडाणा, मूळचा राहणार बोदवड, जि. जळगाव) यांना राम व श्याम ही दोन जुळी मुले. राम हा बोदवड येथे शेती व बीएस्सीचे शिक्षण घेतो तर श्याम जळगावातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीत फार्मसीचे द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. तो नेहरूनगरात रूम करून राहत होता. शनिवार, 14 रोजी त्याचे कॉलेजमधील एका मुलासोबत भांडण झाले. त्याबाबत प्राचार्य योगेश पवार यांच्याकडे जाऊन सांगितल्यावर प्राचार्य पवार यांनी श्याम या एकट्याला पीव्हीसी पाईपने मारहाण केली.

व्यथित होवून केली आत्महत्या
या प्रकारानंतर खचलेल्या श्याम प्रभाकर पाटील याने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी घडलेला सर्व प्रकार विद्यार्थ्याने सुसाईड नोटवर लिहिला व आपल्या मित्रालाही मी गेल्यावर ही स्टोरी इंस्टाग्रामवर टाक, असा संदेशही दिला.







