!-- afp header code starts here -->

सहा हजारांची लाच भोवली : आश्वी तलाठ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात


Bribe of Rs 6,000 taken: Three including Ashwi Talathi in ACB’s net अहिल्यानगर (18 फेब्रुवारी 2026) : कुणबी जातीचा दाखला काढण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारताना आश्वी बुदूक तलाठ्यासह तिघांना एसीबीने अटक केली.

तलाठी बाबासाहेब गंगाधर बोर्‍हाडे, मेडिकल स्टोअर चालक हितेश सोमनाथ घोडेकर (28, राजापूर रोड, ढोलेवाडी, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर), प्रतीक विजयकुमार कातोरे (26, सांगवी, ता.संगमनेर) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार शिक्षण घेत असून त्यांचा कुणबी जातीचा दाखला व कास्ट व्हॅलिडीटी काढण्यासाठी त्यांनी तलाठी बोर्‍हाडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी प्रांत व तहसीलमध्ये ओळख असल्याचे सांगून 13 हजार रुपये घेतले होते. तक्रारदाराच्या मोठ्या बहिणीचा कुणबी जातीचा दाखला काढण्यासाठी सहा हजार व कास्ट व्हॅलिडीटी काढण्यासाठी सात हजार मागण्यात आल्यानंतर तक्रार करण्यात आली. पडताळणीत कुणबी जातीच्या दाखल्यासाठी सहा हजारांची मागणी करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. खाजगी ईसम घोडेकर यांनी लाच स्वीकारून ती भाचा प्रतीक कातोरेकडे दिल्याने सुरूवातीला दोघांना व नंतर तलाठी बोर्‍हाडे यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपूटे, कॉन्स्टेबल रवींद्र निमसे, कॉन्स्टेबल बाळासाहेब कराड, हवालदार हारुण शेख आदींच्या पथकाने कारवाई केली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !