धुळे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : 24 तासात घरफोडीचे दोन गुन्हे उघड
दोन आरोपींना अटक : 90 हजारांचा मुद्देमाल पथकाकडून जप्त
Dhule Crime Branch’s big achievement: Two burglary cases solved in 24 hours धुळे (18 फेब्रुवारी 2026) : धुळ्यातील आझाद नगर हद्दीतील दोन भागात झालेल्या घरफोडी प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन्ही घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. रेहान ऊर्फ पोपण्या फरीद पठाण (अंबिकानगर, पत्रेवाली मशीदजवळ, धुळे) व शाहरुख शेख सलीम (20, अंबिका नगर, पत्रेवाली मशीदजवळ, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
24 तासात दोन गुन्हे उघड
धुळे शहरातील अभय कॉलेजजवळील राम नगरातील प्लॉट न.31 मधून अज्ञात चोरटयाने 45 हजार 950 रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने, इर्न्व्हटर व बॅटरी लांबवल्याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल होता. 14 ते 17 दरम्यान ही चोरी झाली होती. दुसर्या घटनेत धुळे शहरातील मनोहर टॉकीज मागील अमरनगरातील पंकज मेकले यांच्या राहत्या घरातून 96 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. दोन्ही घरफोडी प्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल होता.

दोघांना बेड्या : 90 हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रेहान ऊर्फ पोपण्या फरीद पठाण (अंबिकानगर, पत्रेवाली मशीदजवळ, धुळे) व शाहरुख शेख सलीम (20, अंबिका नगर, पत्रेवाली मशीदजवळ, धुळे) यांना बेड्या ठोकल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.18 बी.बी.0716) तसेच 60 हजार 500 रुपये रुपये किंमतीचा अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.







