!-- afp header code starts here -->

भुसावळातील 32 वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी


32-year-old youth from Bhusawal jumps into Tapi river भुसावळ (19 फेब्रुवारी 2026) : भुसावळातील काझी प्लॉटमधील रहिवासी हर्षल विलास विसपुते (32) या तरुणाने बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तापी नदीवर आपला मोबाईल ठेवत तापी नदीत उडी मारली. तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण कळू शकले नाही तर रात्री उशिरापर्यंत तरुणाचा शोध न लागल्याने गुरुवारी सकाळपासून शोध मोहिम सुरूच ठेवण्यात आली आहे.

तापी पुलावरून अचानक घेतली उडी
मजुरीची कामे करणारा हर्षल बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पुलावर आला. यानंतर त्याने पुलावरून खाली नदीत उडी मारली. हा प्रकार रस्त्याने ये-जा करणार्‍यांनी हा प्रकार पाहिला. दरम्यान, नदीत उडी घेण्याआधी हर्षलने त्याचा मोबाईल पुलावर ठेवला होता. यामुळे हा प्रकार उघड झाल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

ही माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी आले. या प्रकारानंतर तापीच्या पुलावर गर्दी होऊन काही वेळ वाहतूक कोंडी झाली.न शेळगाव बॅरेजचे दरवाजे बंद असल्याने तापी नदीत बॅकवॉटरचा फुगवटा तयार झालेला आहे. यामुळे शोधकार्यात अडथळे आले.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !