!-- afp header code starts here -->

पिंपळनेरात लग्न मंडपात तिघांचा खून : वादग्रस्त स्टेटस ठेवणार्‍या चौथ्या आरोपीलाही अटक


Three killed in wedding tent in Pimpalnerat: Fourth accused with controversial status arrested पिंपळनेर, ता.साक्री (20 फेब्रुवारी 2026) : मान-पान नाट्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाचे पर्यावसन लग्न मंडपात झाले. वादग्रस्त स्टेटसची विचारणा केल्यानंतर तयारीनिशी आलेल्या संशयीतांनी धारदार चाकूच्या सहाय्याने तीन जणांचा बळी घेतला तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना पिंपळनेरच्या घोडामाळ परिसरात निळकंठ नगरात गुरुवारी दुपारी एक वाजता घडली. तीन जणांच्या खून प्रकरणी पोलिस व ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन जणांना गुरुवारीच अटक करण्यात आली तर वादग्रस्त स्टेटस ठेवणार्‍या चौथ्या आरोपीलाही रात्री उशिरा पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनिल हट्टू गोसावी (32, बाप्पा सीताराम नगर, सोनगड गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

लग्न मंडपात रक्तरंजीत सडा
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील घोडामाळ परिसरात निळकंठ नगरातील विजयगिरी गोसावी यांची कन्या रोहिणीचा विवाह सोनगड येथील रणवीर गोसावी या तरुणाशी निश्चित करण्यात आला होता. गुरुवार, 19 रोजी हळद व 20 रोजी नियोजित लग्न होते. लग्नासाठी सोनगड व साक्री येथील वर्‍हाडी पिंपळनेरला आले होते. याआधी दोघांच्या साखरपुड्यात नातेवाईकांमध्ये मानापमानावरून वाद झाला होता. त्यातच एकाने ‘तुमचे अस्तित्व संपवू’ अशा आशयाचे वादग्रस्त स्टेटस व रील्स ठेवल्याने त्याचा जाब गुरुवारी विचारल्यावरून वाद उफाळला व तयारीनिशि आलेल्या आरोपींनी चाकूचे वार केल्याने तिघांचा मृत्यू ओढवला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

पिता-पूत्रांसह तिघांचा खून
संशयीतांनी यावेळी धारदार चाकूने हल्ला केल्यानंतर सुरेश सुपडूगीर गोसावी (50), त्यांचा मुलगा साहिल सुरेशगीर गोसावी (30) यांचा जागीच मृत्यू झाला तर देवेंद्र (देवा) ज्ञानेश्वर पवार (36) यांचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला. दरम्यान हल्ल्यात पंकज अशोक गोसावी, सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

ग्रामस्थांच्या सतर्कतेने तिघांना अटक
तीन जणांच्या खुनानंतर ब्रेझा कारने गुजरातकडे सुसाट निघालेल्या तिघत्तंना मध्यप्रदेश व गुजरातच्या सीमेवर ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले. कांतीलाल गोसावी (42), जसवंत गोसावी (35), महेंद्र गोसावी (तिघे रा.सोनगड, गुजरात) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत तर वादग्रस्त स्टेटस ठेवणार्‍या अनिल हट्टू गोसावी (32, बाप्पा सीताराम नगर, सोनगड गुजरात) यास गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विवाह सोहळा स्थगित
लग्नसोहळ्यात शोककळा पसरल्यामुळे आयोजकांनी हा विवाह स्थगित करण्यात आला. नवरदेवाला घेवून वर्‍हाडी सोनगडकडे परतले. या घटनेने धुळे जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !