!-- afp header code starts here -->

केंद्रीय कृषिमंत्र्यांचा जळगाव दौरा ; ‘भूमी सुपोषण व संरक्षण अभियान’ची पूर्वतयारी बैठक


ज्ळगाव (20 फेब्रुवारी 2026) : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान लवकरच जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्याहस्ते 19 मार्च रोजी अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संरक्षण अभियान’चा शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदारअमोल जावळे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

देशभरातून पाच हजार कृषि प्रेमी येणार
या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक नियोजन, सुविधा व समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘भूमी स्वस्थ तर समाज स्वस्थ’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर परिसरात राबविण्यात येणार आहे. शेती, मातीचे आरोग्य, नैसर्गिक शेती, तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत कृषीपद्धती या विषयांवर व्यापक संवाद होणार असून देशभरातून सुमारे 5 हजार कृषीप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी रासायनिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात घेता मातीचे पोषण, बियाण्यांपासून शेती पद्धतीपर्यंत नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच, प्रशासन, सामाजिक संघटना आणि शेतकरी यांचा सक्रिय सहभाग या अभियानाला व्यापक चळवळीचे रूप देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमासाठी आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय सुनिश्चित करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून, जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !