जळगाव सायबरच्या नूतन निरीक्षकपदी प्रदीप ठाकूर : जिल्ह्यातील दोन निरीक्षकांसह दहा सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या
राहुल भंडारे यांच्याकडे भुसावळ शहर वाहतूक शाखेची तर गणेश फड यांच्याकडे सावद्याची धूरा
गणेश वाघ
Pradip Thakur appointed as the new Inspector of the Jalgaon Cyber Cell ; transfers ordered for ten Assistant Inspectors, including two Inspectors from the district भुसावळ (25 जून 2026) : जळगाव जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक व अन्य आठ सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केल्या आहेत. अनेक ठाण्यांमध्ये पद रिक्त असल्याने अधिकार्यांची प्रतीक्षा लागून होती. बदल्या संदर्भातील आदेश गुरुवार, 25 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढले आहेत.
प्रदीप ठाकूर यांच्याकडे सायबर सेलची धुरा
नियंत्रण कक्षातील निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांच्याकडे आता सायबर सेलची धुरा सोपवण्यात आली आहे तर नियंत्रण कक्षातील निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्याकडे जिविशा शाखेची धूरा देण्यात आली आहे.


पाच सहाय्यक निरीक्षक व दोन उपनिरीक्षकांच्या बदल्या
सावदा प्रभारी विशाल पाटील यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांचे रिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागी आर्थिक गुन्हे शाखेचे गणेश फड यांची सावदा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भुसावळ शहरचे राहुल भाऊसाहेब भंडारे यांची भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या प्रभारीपदी तर रामानंदनगरचे निलेश राजपूत यांची एमआयडीसी ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अडावद प्रभारी प्रमोद वाघ यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. धरणगावचे उपनिरीक्षक संतोष काशीनाथ पवार यांची गुन्हे शाखेत तर एटीबीचे सुनील शामकांत पाटील यांची डायल 112 येथे बदली करण्यात आली आहे.
नव्याने जिल्ह्यात आलेल्या चौघांची ठाण्यात वर्णी
जिल्ह्यात नव्याने बदलून आलेल्या एपीआय विजय श्रीकृष्ण माळी यांची भुसावळ शहर ठाण्यात तर फोर्सवनचे एपीआय सुनील बापू कदम यांची धरणगाव ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कृष्णा वासुदेव पाटील यांची एमआयडीसी ठाण्यात तर उपनिरीक्षक निवांत जयजितसिंह जाधव यांची बाजारपेठ ठाण्यात बदली करण्यात आली.
चार अधिकार्यांच्या विनंती बदल्या
चार अधिकार्यांना विनंतीनुसार पोस्टींग मिळाली आहे. त्यात एका सहाय्यक निरीक्षकांसह तीन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. एमआयडीसी ठाण्याचे एपीआय माधुरी बोरसे यांची मानव संसाधन विभाागात बदली करण्यात आली. एमआयडीसी उपनिरीक्षक मो.अली सत्तार अली यांची भुसावळ बाजारपेठ ठाण्यात बाजारपेठ ठाण्यात तर बाजारपेठच्या भारती सागर काळे यांची चाळीसगाव ग्रामीण ठाण्यात व डायल 112 चे दीपक प्रभाकर जगदाळे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.
