!-- afp header code starts here -->

यावल शहरातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवताना तिघांना पकडले : तिघांविरुद्ध गुन्हा


Three caught providing copies at an examination center in Yaval city : Case against the three यावल (20 फेब्रुवारी 2026) : यावल शहरातील डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर केंद्राच्या आवारात कॉपी नेऊन कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. यावल पोलिसात तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढे कोणत्याही केंद्रावर जर कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करताना कोणी मिळून आला तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

काय घडले यावल शहरात ?
शहरात शासकीय विश्रामगृहाजवळ डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचे इयत्ता दहावीचे परीक्षा केंद्र आहे. शुक्रवारी येथे उर्दू आणि मराठी या भाषा विषयाचा इयत्ता दहावीचा पेपर होता. या परीक्षा केंद्रावर यावलचे पोलिीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे व पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला होते. तेव्हा येथे कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करताना एक यावल शहरातील शेरा चौकमधील रहिवाशी मुलगा तसेच एक दहिगाव या गावातील व एक हरिपूर गावातील मुलगा अशा तीन मुलांना यावल पोलिसांनी कॉपी पुरवण्याच्या प्रयत्नात परीक्षा केंद्राच्या आवारातून ताब्यात घेतले.

तिघांविरोधात गुन्हा
या तिघांविरुद्ध सहायक पोलिस निरिक्षक अजयकुमार वाळवे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम 1982 चे कलम 7 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.

केंद्राच्या आवारात संशयितरित्या दिसल्यास गुन्हा
यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व शहरातील इयत्ता दहावीच्या व इयत्ता बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. परीक्षा केंद्राच्या आवारात जर कोणी संशयास्पदरित्या वावरताना जरी दिसला तर त्याच्याविरुद्धदेखील पोलिस कठोर कारवाई करतील व त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !