मी प्रेम केलं तर दुसरं लग्न करायला काय हरकत ! मुलीच्या टोकदार बोलण्यानंतर आईने केला खून


If I love you, what’s the problem with getting married again? Mother commits murder after daughter’s pointed remarks छत्रपती संभाजीनगर (21 फेब्रुवारी 2026) : मुलीच्या टोकदार प्रश्नामुळे आईचा संताप अनावर झाल्याने तिने बाथरूममध्ये बसलेल्या 21 वर्षांच्या मुलीचा रबराच्या पाईपने गळा आवळून खून केला. ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे घडली आहे. नंदिनी राजू धीवरे (21) असे मृत तरुणीचे नाव आहे तर आई भारती उमेश साबळे, सावत्र वडील उमेश गोविंद साबळे आणि मामा अमोल गायकवाड यांच्यावर एमआयडीसी वाळूज पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला.

असे आहे प्रकरण ?
मृत नंदिनीचा प्रेमविवाह झाला होता. ती पतीपासून विभक्त होऊन तीन वर्षांपासून आईसोबत राहत होती. यास दरम्यान तिचे कन्नड येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते मात्र आई भारतीचा त्याला विरोध होता. यावरून गेल्या आठ दिवसांपासून घरात सतत भांडणे होत होती. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास घरात कुणी नसताना पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी नंदिनीने आईला म्हटले ‘तू दुसरा नवरा केला, मी करायला काय हरकत?’ हा प्रश्न भारतीच्या जिव्हारी लागला. त्यामुळे तिने रबरी पाइपने नंदिनीचा गळा आवळला.

रिक्षा चालकाला संशय अन् खुनाचा उलगडा
आईने खुनाची माहिती पती व भावाला दिली. त्यानंतर ती पतीसह रात्री नऊच्या सुमारास रिक्षातून मृतदेह घेऊन निघाली मात्र तिसगाव चौफुली परिसरात रिक्षा चालकाला त्यांच्या वागण्याचा आणि गादीतील संशयास्पद वस्तूचा संशय आला. त्याने त्यांना तेथेच उतरवून देत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी गादी उघडून पाहिली असता त्यात तरुणीचा मृतदेह आढळला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !