चाळीसगावात बंद घरातून 36 हजारांचा ऐवज लांबवला
Property worth Rs 36,000 recovered from a closed house in Chalisgaon चाळीसगाव (21 फेब्रुवारी 2026) : चाळीसगाव शहरातील धुळे रोडवरील मारूती शोरूमच्या पाठीमागील बंद घराचे कडीकुलूप तोडून कपाटात ठेवलेल्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिणे मिळून 36 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी भूषण सैंदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
चाळीसगाव शहरातील रहिवासी भूषण छबुलाल सैंदाणे (मारूती शोरूमच्या पाठीमागे, धुळे रोड, चाळीसगाव) हे कुटुंबासह बुधवार, 18 रोजी सायंकाळी उपखेड गावी गेल्याने घर बंद होते. गुरुवार, 19 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घरी चाळीसगावी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे व आतील दरवाजाचे लॉक तुटलेले दिसले. घरात जावून पाहिल्यानंतर कपडे व इतर वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आढळलया तसेच कपाटात ठेवलेले दागिणे व रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले.
चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल, 15 हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे व रोख दीड हजार मिळून 36 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. शहरातील वाढत्या चोर्या-घरफोड्यांनी नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.







