सात दिवसांपूर्वीच साखरपूडा : नियोजित वधू-वराचा भीषण कार अपघातात मृत्यू


Seven days before the wedding: The intended bride and groom died in a horrific car accident वाशी (22 फेब्रुवारी 2026) : अवघ्या सात दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नियोजित वधू-वराचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय शिनगारे (25) व इजोरा (वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया चव्हाण (23) यांचा गत रविवारी (15 फेब्रुवारी) साखरपुडा झाला मात्र नियोजित वधू-वर रविवारी लातूर येथे महापारेशनची परीक्षेसाठी जात असताना हा अपघात घडला.

वधूच्या परीक्षेसाठी लातूरला जाताना अपघात
या परीक्षेसाठी अक्षय व अक्षया हे कारने पहाटे वाशी येथून लातूरच्या दिशेने निघाले. पहाटे सहा वाजेच्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार भरधाव वेगात थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. त्यात अक्षय व अक्षया या दोन्ही नियोजित वधू वराचा जागीच मृत्यू झाला.

कारचालक गंभीर जखमी
अपघातात चालक अक्षय सिरसाट (22) हा गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतील. त्यांनी जखमी चालकाला 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील सोपस्कारासाठी येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. साखरपुड्यानंतर अवघ्या चार दिवसांतच नियोजित वर-वधूचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण वाशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !