जळगाव शहरात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या
जळगाव (22 फेब्रुवारी 2026) : शहरातील 33 वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर गुरुवारी सकाळी या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर गहिनीनाथ नालकोट (33, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे
ज्ञानेश्वर या तरुणाने शनिवार, 14 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या राहत्या घरी काहीतरी विषारी औषध प्राशन केले होते. ही बाब लक्षात येताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) दाखल केले. ज्ञानेश्वर यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र प्रकृती खालावत गेल्याने 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.24 वाजता उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले.
तरुणाचे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेबाबत जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त माहितीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.