त्रिशूला नदीत बस कोसळून 18 प्रवासी ठार


18 passengers killed as bus falls into Trishula river काठमांडू (23 फेब्रुवारी 2026) : पोखराहून काठमांडूकडे निघालेल्या बसला नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा अपघात घडला. नियंत्रण सुटलेली बस थेट महामार्गावरून त्रिशूला नदीत कोसळून झालेल्या अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष आणि एक महिला परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

मृतांची ओळख पटवण्यावर भर
आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नंतर आणखी एका प्रवाशाच्या मृत्यूची पुष्टी झाली, त्यामुळे मृतांचा आकडा 18 वर पोहोचला. अपघातात जखमी झालेल्या लोकांना वाचवून वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. आतापर्यंत मृत आणि जखमींची ओळख पटलेली नाही.

बस (जी.ए.1 खा 1421) पोखराहून काठमांडूकडे जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस त्रिशूली नदीत कोसळली. हा अपघात धादिंग जिल्ह्यातील बेनिघाट रोरांग परिसरात रात्री सुमारे 1.30 वाजता झाला. सध्या पोलिस अपघाताच्या इतर कारणांचीही चौकशी करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !