कंटेनर अपघातानंतर दुचाकी लांबवल्या : मध्यप्रदेशातील चोरट्यांना शिरपूर तालुका पोलिसांकडून अटक

तीन आरोपींकडून एक लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त


Two-wheeler stolen after container accident: Thieves from Madhya Pradesh arrested by Shirpur taluka police शिरपूर (24 फेब्रुवारी 2026) : सेंधवा शहराकडून शिरपूरकडे येत असलेल्या कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला होता. या अपघाताची संधी साधून चोरट्यांनी कंटेनरमधील तीन दुचाकींसह दुचाकींचे स्पेअर पार्ट लांबवले होते. शिरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीतांचा शोध घेत त्यांच्याकडून एक लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

असे आहे नेमके प्रकरण ?
12 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर सेंधव्याकडुन शिरपूरकडे येत असलेला कंटेनर (आर.जे.14 जी.एच.0835) वरील नियंत्रण सुटल्याने वाहन अपघातग्रस्त झाले. ही संधी साधून हिरो कंपनीच्या दोन मोटारसायकल, साईड ग्लास, बॅटर्‍या व इतर साहित्य आदी मिळून एक लाख 64 हजार 280 रुपये किंमतीची मुद्देमाल लांबवण्यात आला होता. शिरपूर तालुका पोलिसांनी चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.


तीन आरोपींना अटक : मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दिलीप शांतीलाल रावत (मालवन, ता.वरला, जि.बडवाणी), सुमित हिरालाल कौशल (मालवन, ता.वरला, जि.बडवाणी, म.प्र) तसेच कृष्णा गुलाब पावरा (पळासनेर, ता.शिरपूर) यांना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत पळासनेर येथूनही दुचाकी लांबवल्याची कबुली देत वाहन काढून दिले.

आरोपींकडून मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून प्रत्येकी 58 हजार 90 रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, 50 हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा स्प्लेंडर (एम.पी.46 एम.सी.1343), 10 हजार रुपये किंमतीच्या दुचाकीच्या 20 बॅटर्‍या, तीन हजार रुपये किंमतीचे 30 साईड ग्लास, तीन हजार 700 रुपये किंमतीचे सायलेन्सरचे 37 स्टील कव्हर, पाच हजार 400 रुपये किंमतीचे टूल पाने, दोन हजार 800 रुपये किेंमतीच्या सायलेन्सरची 28 मेटल पट्टा मिळून एक लाख 92 हजार 330 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना 27 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून तपास हवालदार अनिल शिरसाठ करीत आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक मनोज कचरे, हवालदार अनिल शिरसाठ, हवालदार संतोष पाटील, हवालदार संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल विजय ढिवरे, कॉन्स्टेबल वाला पुरोहीत, चालक हवालदार गिरधर पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !