आव्हाणेत मुलगा पळवण्याच्या संशयातून मारहाणीत तरुणाचा मृत्यू : पाच संशयीतांना अटक
Youth dies after being beaten to death on suspicion of kidnapping son in Awane : Five suspects arrested जळगाव (25 फेब्रुवारी 2026) : मुलगा पळवण्याच्या संशयातून सोमवारी जमावाकडून बेदम मारहाण झाल्यानंतर अनोळखीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात सोमवार, 23 फेब्रुवारीला रात्री आठ वाजता घडली. जळगाव तालुका ठाण्याचे अंमलदार श्रीकांत बदर यांच्या फिर्यादीवरून पाच जणांसह इतर संशयितांविरुद्ध खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना अटक करण्यात आली.
संशय उठला तरुणाच्या जीवावर
मुलगा पळवण्याच्या संशयातून सोमवारी आव्हाणे शिवारात एकाला जमावाकडून मारहाण झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणी मनोहर सोनवणे (नांद्रा खुर्द), अजय कोळी (थोरगव्हाण), प्रशांत सोनवणे, अजय सोनवणे (दोघे रा. बामणोद) व आफताब आरिफ खाटीक (शनिपेठ, जळगाव) याां अटक करण्यात आली.

आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगमधील मनोहर सोनवणे यांचा तीन वर्षीय मुलगा विराटला एक तरुण पळवून असल्याच्या संशयावरून जमावाने अनोळखी तरुणाला मारहाण केली मात्र 24 रोजी पहाटे चार वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.