राज्यातील पहिलीच कारवाई : धुळ्यातील व्यापार्‍याची 65 लाखात फसवणूक करणार्‍या आरोपीची 29 लाखांची मालमत्ता जप्त


First action in the state : Property worth Rs 29 lakh seized of accused who cheated Dhule businessman of Rs 65 lakh धुळे (25 फेब्रुवारी 2026) : धुळ्यातील 51 वर्षीय व्यापार्‍याची कामाला ठेवलेल्या संशयीताने 65 लाखात फसवणूक केली होती. या प्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र संशयीत गुन्हा दाखल होताच पसार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात प्रथमच बीएनएस कायद्यातील तरतुदीचा आधार घेत संशयीताची तब्बल 28 लाख 66 हजारांची मालमत्ता न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत जप्तीचे आदेश मिळवले आहेत. नवीन बीएनएस कायद्याचा 107 नुसार गुन्ह्यातील आरोपीची मालमत्ता शोधून ती जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना मिळाले आहेत. राज्यात एखाद्या आरोपीच्या मालमत्तेवर कारवाई करण्याची राज्यातील ही पहिलीच व दुर्मीळ कारवाई असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशी झाली फसवणूक
धुळ्यातील उद्योजक शंकर मूलचंद शेतिया (जवाहर नगर, साक्री रोड, धुळे) यांचा अ‍ॅल्युमिनिअम सेक्शन विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसाय चालवण्यासाठी संशयीत पंचानन उर्फ रणजित सुरत राणा (सुनावल, बदम्बा, जि.कटक, ओडिशा, ह.मु.साईकृपा नगर, तिखी रोड, अवधान, धुळे) याला कामावर ठेवले होते. शेतीया हे कंपनीत येत नसल्याने आरोपीने त्यांचा विश्वास संपादन करीत काही काळ व्यवहाराचा हिशोब बरोबर दिला मात्र ऑगस्ट 2020 पासून ते 24 सप्टेंबर 2025 दरम्यान आरोपीने उद्योजकाचा विश्वासघात करीत रणजितने कंपनीत येणारा माल परस्पर विक्री करून 65 लाखांचा अपहार केला. या रकमेतून आरोपीने धुळ्यात मालमत्ता खरेदी केली होती. उद्योजकाने या प्रकरणी मोहाडी पोलिसात 9 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.


बीएनएस कायद्याचा आधार घेत जप्त केलेली प्रॉपर्टी
आरोपी रणजित राणा याने पोलिस कारवाईच्या भीतीने धुळ्यातील पळ काढला मात्र तपासादरम्यान धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या परवानगीने मोहाडी पोलिसांनी बीएनएसएस कलम 107 चा आधार घेत धुळे न्यायालयात रणजितच्या मालमत्तेची माहिती देत जप्तीचा अहवाल दिला होता. त्यावर न्या.भाग्यश्री पोतदार यांनी या खटल्याचा निकाल लागेपर्यंत राणाची मालमत्ता जप्तीचे आदेश दिले. यातून राणाची 29 लाख 66 हजार 489 रुपयांची मालमत्ता व बँक खाते जप्त करण्यात आले. ही कारवाई मोहाडी पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, उपनिरीक्षक अशोक पायमोजे, हेड कॉन्स्टेबल संदीप कदम, नीलेश पाटील आदींच्या पथकाने केली. न्यायालयाच्या आदेशानंतर राणाच्या नावे असलेले तीन प्लॉट, दोन घरं, अन्य एक प्लॉट तसेच महागड्या कारचा समावेश आहे.

गुन्हेगारांना पोलिसांकडून मिळाला कडक इशारा
आतापर्यंत फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी गुन्हा करून पसार होत होते मात्र आता नवीन कायद्यानुसार आरोपींच्या मालमत्तेवर टाच येणार आहे. फसवणुकीचा गुन्हा केल्यानंतर आरोपींनी संपत्ती कमावली तरी त्यांना ती उपभोगता येणार नाही व या माध्यमातून गुन्हेगारांना पोलिसांनी कडक इशाराही दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !