भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले : दुचाकीस्वार मजूर जागीच ठार ; चालक गंभीर


Speeding truck hits two-wheeler : Two-wheeler laborer dies on the spo ; driver critical पहूर (25 फेब्रुवारी 2026) : भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेले मजूर ईश्वर भानुदास सोनवणे (45) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक शाम यादव चौधरी (30) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी सुमारे 4.15 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 75 वरील साई हॉटेलसमोर ही दुर्घटना घडला.

शेतात परतत असताना अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, मृत ईश्वर सोनवणे आणि शाम चौधरी हे शेतातून मका कापणीचा सौदा करून घरी परतत होते. त्यांच्या दुचाकी (क्र.एम.एच.19 डी.बी.2150) ला भरधाव येणार्‍या ट्रक (एम.एच. 20 सी.टी. 8053) मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी हवेत सुमारे 7 ते 10 फूट उंच उडाली. याच दरम्यान ट्रकने समोरून येणार्‍या दुसर्‍या एका दुचाकीस्वारालाही धडक दिली मात्र, त्या दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखून वेळीच उडी घेतल्याने त्याचे प्राण थोडक्यात वाचले.


अपघातानंतर महामार्गावरील सद्दाम शेख व सचिन पाटील यांनी जखमींना तात्काळ पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी शाम चौधरी यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात करून पळून जाणार्‍या ट्रक चालकाचा इम्रान भाई या रिक्षाचालकाने पाठलाग केला आणि त्याला मेट्रो वाईंन शॉपजवळ पकडून दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !