नवापूर तालुक्यात 55 वर्षीय महिलेची अत्याचारानंतर हत्या : तरुणाला अटक


55-year-old woman murdered after torture in Navapur Taluka:  Youth arrested विसरवाडी (26 फेब्रुवारी 2026) : एकाच गावातील परिचित दोघे रस्त्याने येत असताना 23 वर्षीय तरुणाने 55 वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करीत तिची हत्या केल्याची संतापजनक घटना विसरवाडी पोलिस ठाणे हद्दीत घडली. अत्याचारानंतर आरोपीने महिलेची क्रुरपणे हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

असे आहे प्रकरण
नवापूर तालुक्यातील गंगापूर-नान्हीपाडा रस्त्यावरील एका ज्वारीच्या शेतात 55 वर्षीय महिलेची हत्या झाली होती. शवविच्छेदन अहवालात महिलेवर आधी अत्याचार करण्यात आल्यानंतर तिची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला. 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9:30 च्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी मनिल छगन नाईक (23, रा. गंगापूर) या संशयित तरुणाला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 1 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.


 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !