जळगावात आठवीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या


जळगाव (28 फेब्रुवारी 2026) : जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरात एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथम हरीश कटारे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो ला.ना.शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

काय आहे प्रकरण
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम कटारे हा अभ्यास करत नसल्याने त्याची आई त्याला रागावली होती. या कारणामुळे तो मनाने खचला आणि घरात कुणी नसल्याची संधी साधत त्याने राहत्या घराच्या छताला गळफास घेतल्याचे समोर आले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !