आधी नोकरी देण्याचा बहाणा नंतर चक्क विवाहितेची दोन लाखात केली विक्री


First, on the pretext of providing a job, a married woman was sold for two lakhs. नाशिक (2 फेब्रुवारी 2026) : पतीपासून विभक्त असलेल्या महिलेची ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने दोन लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
सातपूरच्या कार्बन नाका परिसरात पीडिता पतीपासून विभक्त राहते व तिला तान्हे बाळही आहे. या महिलेला 27 फेब्रुवारी रोजी राणी आणि भागी नावाच्या दोन महिला एजंटांनी संपर्क साधला. इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो, असे सांगत तिला विश्वासात घेतले. त्यानंतर कारमधून तिला मालेगावमार्गे थेट नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेले. तेथे नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून दोन लाख रुपये घेत पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचा आरोप आहे. एका रात्रीत आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची जाणीव झालेल्या पीडितेने 28 फेब्रुवारी रोजी कसाबसा मोबाईलवरून आईशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला.



300 जणांच्या जमावातून सुटका
पीडितेच्या पालकांनी तातडीने सातपूर पोलिस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे पथक लगेच जातेगावकडे रवाना झाले. तेथे सुमारे 300 ग्रामस्थांचा जमाव होता. तणावपूर्ण वातावरणात पोलिसांनी धाडसाने कारवाई करत पीडितेची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली असून आणखी सहा संशयित फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. या मागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !