जळगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक
Minor girl raped in Jalgaon taluka: Accused arrested जळगाव (5 मार्च 2026) : जळगाव तालुक्यातील एका भागात राहणार्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी बुधवार, 4 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली.
जळगाव तालुक्यातील एका गावात बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. संशयित संदीप बळीराम तायडे (जळगाव तालुका) याने 2 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता पिडीत मुलीशी गोड बोलून जवळीक साधली आणि तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले.






त्यानंतर तिला शाळेत सोडण्याच्या निमित्ताने घरून घेवून नशिराबाद भुसावळ रोडकडे घेवून जावून एका झोपडीत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानुसार तिचे पालक यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार नराधम संदीप तायडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करताच त्याला अटक करण्यात आली. तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.







