भुसावळात नववधूचे दागिने लांबवले : मध्यप्रदेशातील आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक


Bride’s jewellery stolen in Bhusawal: Accused from Madhya Pradesh arrested by Crime Branch भुसावळ (5 मार्च 2026) : भुसावळातील बालाजी लॉनमध्ये लग्न सोहळा सुरू असताना वर मायकडे असलेल्या पर्समधून नववधूचे दागिने लांबवण्यात आले होते. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रितीक सिकंदर सिसोदीया व कृषि निरज बेडीया (दोन्ही रा.कडीया सांसी, नरसिंहपूर, जि.राजगड, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 92 हजार 740 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.

असे आहे चोरी प्रकरण
भुसावळातील उज्वला प्रबोध भावे (50, भुसावळ) यांचा मोठा मुलगा भावेशचे 6 फेब्रुवारी रोजी भुसावळातील बालाजी लॉनमध्ये लग्न होते व नववधू कांचनसाठी लग्नात केलेले दागिणे उज्वला यांच्या पर्समध्ये ठेवण्यात आले होते. लग्नविधी सुरू असताना चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी नजर चुकवून पर्स लांबवली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.




यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुलकुमार गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेडेड उपनिरीक्षक रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, हवालदार उमाकांत पाटील, नाईक विकास सातदिवे, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, चालक कॉन्स्टेबल प्रमादे ठाकूर आदींच्या पथकाने केली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !