शिरसाडला शेत विहिरीजवळील गुलाबाचे फुल तोडतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू
A young woman died after losing her balance and falling into a well while picking roses near a farm well in Shirsadla. यावल (6 मार्च 2026) : यावल तालुक्यातील शिरसाड या गावातील रहिवाशी ए22 वर्षीय तरुणी शेत-शिवारात एका शेतात या विहिरीजवळ असलेल्या गुलाबाच्या झाडावरून फुलं तोडत असताना तिचा तोल गेल्याने ती विहिरीत बुडून मरण पावली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. लक्ष्मी दिलीप सपकाळे (22) असे मयताचे नाव आहे.
तोल जावून पडल्याने मृत्यू
लक्ष्मी सपकाळे ही तरुणी बुधवारी गावालगतच्या रमेश शिवदास बडगुजर यांच्या शेत गट क्रमांक 77 मध्ये गेली असता विहिरीजवळील गुलाबाच्या झाडावरून फुल तोडत असताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत कोसळली. हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने ग्रामस्थांनी विहिरीजवळ धाव घेत तरुणीला पाण्यातून काढून तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात किरण दिलीप सपकाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोहील गणेश करीत आहे.













