विषारी द्रव्य प्राशन केलेल्या डांभूर्णीतील इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू


Man from Dambhurni who consumed poisonous substance dies during treatment यावल (6 मार्च 2026) :यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील 40 वर्षीय इसमाने काहीतरी विषारी औषध प्राशन केल्याने त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

संजय काशीनाथ कोळी (40) असे मृताचे नाव आहे.




काय आहे प्रकरण ?
डांभूर्णीतील संजय कोळी यांनी राहत्या घरी काहीतरी विषारी औषध प्राशन केले होते. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच त्याला तातडीने उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सीएमओ डॉ.निखिल तायडे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !