जळगावातील भारत फायनान्स बँकेत 31 लाखांचा अपहार : पाच माजी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा


Misappropriation of Rs 31 lakhs at Bharat Finance Bank in Jalgaon: Case filed against five former officials जळगाव (8 मार्च 2026) : जळगावातील ‘भारत फायनान्स’ या खाजगी बँकेत 31 लाख 12 हजार 164 रुपयांचा मोठा अपहार झाला असून या प्रकरणी पाच माजी वसुली अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांनी कर्जदार महिलांकडून हप्त्याची रक्कम वसूल करून ती बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याने ही कारवाई करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
बँकेचे शाखा व्यवस्थापक मनीष देवचंद चौधरी (31) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. हा सर्व गैरप्रकार 8 डिसेंबर 2022 ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडला. बँकेचा वार्षिक ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. तपासणी दरम्यान असे दिसून आले की, कष्टकरी महिलांना दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकार्‍यांनी 336 महिलांकडून नियमितपणे हप्ते गोळा केले होते. मात्र, ही रक्कम बँकेच्या खात्यात जमा करण्याऐवजी अधिकार्‍यांनी परस्पर हडप केली.



तपासणीअंती पाच माजी वसुली अधिकार्‍यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यात शेख अबिद शादुल्ला (रा.सावरगाव, जि.बुलढाणा) यांनी 215 महिला सदस्यांकडून सात लाख 16 हजार रुपयांची वसुली केली, पण बँकेत भरली नाही. प्रदीप हरिचंद्र पवार (रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) याने 34 महिलांकडून 8 लाख 70 हजार रुपयांची रक्कम घेतली. अश्विन रवींद्र पाटील (रा. मुक्ताईनगर) याने 49 महिलांकडून 6 लाख 87 हजार रुपये घेतले.

अक्षय शंकर बारी (रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याने 20 महिलांकडून 4 लाख 90 हजार रुपये परस्पर हडपले. सचिन भिवसिंग राठोड (रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याने 18 महिलांकडून 3 लाख 47 रुपये घेतले. बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, या पाचही जणांनी मिळून एकूण 31 लाख 12 हजार 164 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !